Orator - Lecturer

Visit to London

२० एप्रिल २०१३ रोजी लंडनला झालेले व्याख्यान


३ रे सावरकर विश्व संमेलन....


व्हेनिस येथील सेंट मार्क स्क्वेअर वर डॉ.शेवडे यांचे व्याख्यान


स्वित्झर्लंडला माउंट टीटलीस वर १०२०० फुट उंचीवर शिवराय सांगताना....

          स्वित्झर्लंडमधील  माऊंट टिटलीस या सर्वोच्च शिखरावर (१०२०० फूट) यंदा महाराष्ट्रातील निवडक जणांनी हनुमान जयंती आणि शिव-पुण्यतिथी एकत्र साजरी केली आणि एक प्रकारे युरोपात मराठीचा झेंडा फडकावला.

          सावरकर सेवा संस्था-ठाणे, सावरकर प्रेमी मंडळ-औरंगाबाद आणि महाराष्ट्र मंडळ-लंडन यांनी २० एप्रिल रोजी लंडनमध्ये सावरकर विश्व संमेलन आयोजित केले होते.त्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे १३० लोक सहभागी झाले होते. संमेलनानंतर आयोजित युरोप दौऱ्यात या सर्वानी माउंट टिटलीसला भेट दिली. त्या दिवशी हनुमान जयंती आणि  शिव-पुण्यतिथी होती. शून्याखाली तापमान आणि सर्वत्र शुभ्र बर्फ पसरला होता. शिवरायांसारख्या विश्वविख्यात महावीराचे स्मरण होणे अगदी स्वाभाविक होते. निगडी येथील सावरकर संस्थेच्या कळंबकर यांनी छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार हे गीत म्हटले आणि वातावरण निर्मिती केली. ख्यातनाम साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानन्द शेवडे यांनी शिवरायांची युद्धनीती या विषयावर दणदणीत व्याख्यान दिले. शिवरायांच्या युद्धतंत्रातील बारकावे समजावून सांगताना त्यांनी अफझलखान वधाचा प्रसंग चित्रदर्शी शैलीत सांगितला. दहशतवाद फक्त असाच संपवता येतो हा धडा अफझलखान वधावरून घेता येतो असे डॉ.शेवडे यांनी सांगितले. त्यांचे व्याख्यान ऐकताना महाराजांच्या पराक्रमाच्या उबेने जणू थंडी दूर पळाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. विशेष म्हणजे भाषा समजत नसूनही अनेक गोरे लोक तन्मयतेने व्याख्यान ऐकत होते व छायाचित्रे काढत होते. नंतर कित्येकांनी पुढे येऊन विषय विचारून घेतला. एक अनोखा अनुभव घेऊन सर्व उपस्थित लोक भारावल्या अवस्थेत खाली उतरले.